आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:वस्तुस्थितीनुसार तक्रार न घेतल्याने अधीक्षकांना साकडे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिव कॉलनीत दुमजली घरात पतीसोबत संयुक्त मालकी असलेल्या विवाहिता अश्विनी राहुल चिंचोळे ह्या कौटुंबिक कारणामुळे पतीपासून विभक्त राहतात. त्यांनी पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. २७ सप्टेंबर रोजी त्या शिव काॅलनीतील घरी गेल्या होत्या. यावेळी पतीने त्यांच्या अपरोक्ष प्रवीण किशोर राठोड व पोलिस कर्मचारी मनोज पाटील यांना हे घर भाड्याने दिल्याचे दिसून आले.

त्यामुळे अश्विनी यांनी विचारणा केली असता राठोड याने धक्काबुक्की करुन ढकलले. या प्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी घडलेला प्रकार समजून न घेता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यामुळे अश्विनी यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन राठोडच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, घर रिकामे करायला सांगावे अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...