आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुधारित आकृतिबंधात पुरवठा निरीक्षण अधिकारी, लिपिक पदे कमी;जळगावात अन्नधान्य वितरण कार्यालय नाही

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या पुरवठा विभागाने पुरवठा कार्यालयातील संवर्गनिहाय पदसंख्या निश्चित करण्याबाबत आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी १४४ पदे निश्चित करून देण्यात आलेली आहेत. त्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी व लिपिकांची तीन पदे कमी करण्यात आली. चंद्रपूर, अकोला या लोकसंख्येने कमी असलेल्या जिल्ह्यांना अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय देण्यात आले. तुलनेत लाेकसंख्येने जास्त असलेल्या जळगाव शहरासाठी मागणी असूनही सुधारित आकृतिबंधात हे कार्यालयात नाही. विशेष बाब म्हणून हा आकृतिबंध सुधारित करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी पुरवठा उपायुक्तांकडे मागणी केली आहे.

शहराचा विस्तार मोठा असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद प्रस्तावित करण्यात आलेले होते. सन २०११च्या जनगणनेनुसार अकोला चंद्रपूर शहराची लोकसंख्या ३ लाख २० हजार ३७९ तर अकोला शहराची ४ लाख २५ हजार ८१७ एवढी आहे. त्या तुलनेत जळगाव शहराची लोकसंख्या ४ लाख ६० हजार २२८ एवढी आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी स्वतंंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय लोेकसंख्या कमी असूनही त्या दोन शहरांना देण्यात आले. जिल्हा कार्यालयात लेखा अधिकारी दर्जाचे पदही प्रस्तावित करण्यात आले होते. अर्धन्यायिक कामासाठी स्वतंत्र लघुलेखक पदाची मागणी करण्यात आली होती. आकृतिबंधात जिल्हा कार्यालयातील पदे कमी करून तालुकास्तरावर देण्यात आली आहेत. नवीन आकृतिबंधानुसार जिल्हा कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी पद कमी करण्यात आले.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वाहन असूनही चालक नाही
१ जिल्हास्तरावर दोन लेखा पर्यवेक्षक देण्यात आले होते. त्यापैकी एक पद सुधारित आकृतिबंधात कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४० पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून २४ व गोदाम व्यवस्थापकाची १६ पदे निश्चीत करुन देण्यात आली आहेत. तालुक्यात केवळ एक अव्वल कारकून,पुरवठा निरीक्षक पद ठेवल्याने दोन अव्वल कारकून पदे कमी देणार आहे.

२ जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वाहन असून चालक नाही. त्यासाठी चालकाची मागणी नोंदवण्यात आली होती. जिल्ह्यासाठी एकूण २४ अव्वल कारकुनांपैकी तालुका कार्यालयात १५ पदे दिल्यावर जिल्हा कार्यालयात केवळ नऊ अव्वल कारकूनची पदे शिल्लक राहतील. तालुक्यातील दाेन अव्वल कारकून पदे कमी करण्यात आली आहेत.

३ जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्यांसाठी ३० लिपिकांची पदे देण्यात आली आहेत. तसेच सतरा गोदामांसाठी १६ गोदामपाल दिलेले आहेत. मात्र नवीन आकृतिबंधानुसार पदांची पुनर्रचना केली. जिल्हा कार्यालयातील लिपिक व अव्वल कारकून ही पदे कमी होत आहेत. जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्तावित केल्यानुसार आकृतिबंध सुधारित करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...