आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन धान्य:पुरवठा अधिकाऱ्यांनी सावद्यात स्वत: लाभार्थ्यांना वाटप केले रेशनचे धान्य, सावदा शहरातील इतर स्वस्त धान्य दुकानातून सुरळीत धान्य वाटप

सावदाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा शहरातील इतर स्वस्त धान्य दुकानातून सुरळीत धान्य वाटप होत असले तरी भोई वाड्यातील १५ क्रमांकाचे रेशन दुकान कोचूर येथील धान्य दुकानदाराला जोडले आहे. मात्र, हे दुकान कधीही ठरलेल्या वेळेवर उघडत नाही. मंगळवारी तर कार्ड धारकांनी पहाटे ५ वाजेपासून दुकानाबाहेर रांगा लावल्या. मात्र, दुकान उघडण्याची सकाळी ८ वाजेची वेळ टळून १०.३० वाजले तरीही दुकान बंदच होते. याबाबत तहसीलदारांना तक्रार करताच पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वत: सावदा गाठून सुमारे १०० कार्डधारकांना नियमानुसार धान्य वाटप केले. भोई वाड्यातील रेशन दुकानावरील अडचणीबाबतमाजी नगरसेवक श्यामकांत पाटील, पिंटू धांडे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे, सी.जी.पाटील, तालुका पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांना संपर्क साधला. मात्र, महसूल विभागाचे कर्मचारी संपावर असल्याची अडचण पुढे आली. यानंतर स्वत: पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी सावदा गाठले. संबंधित धान्य दुकानदार, पीओएस मशीनचे इंजिनियर मोहसीन खान यांना बोलावून सुमारे १०० ग्राहकांना नियमानुसार धान्य वाटप केले.