आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटात सामिल:शिंदे गटाला पाठिंबा द्या; अन्यथा विकास थांबेल

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या दाेन गटांतील वर्चस्वाची लढाई आता तीव्र हाेताना दिसते आहे. शिवसेनेतून काेणीही फुटणार नाही याची जशी काळजी घेतली जात आहे, तेवढाच प्रयत्न शिंदे गटात सामिल करण्यासाठी केला जाताे आहे. याची प्रचिती खुद्द महापाैर जयश्री महाजन यांना आली आहे. शिंदे गटाला पाठींबा न दिल्यास थेट शहराचा विकास थांबवण्याची धमकी दिली जात असल्याचा गाैप्यस्फाेट महाजन यांनी माध्यमांशी बाेलताना केला.

जळगाव शहरातील अयाेध्यानगर भागात शुक्रवारी शिवसेनेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यासह शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित हाेते. या वेळी माध्यमांशी बाेलताना महापाैर महाजन यांनी दाेन गटांमधील वर्चस्वाची सुरू असलेली लढाई ती तीव्र झाली आहे याचे उदाहरण ठेवले.

महापाैरांना शिंदे गटात सामिल झालेल्या काही नगरसेवकांकडून निराेप देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंचे समर्थन करण्याऐवजी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यास आता सुरू असलेल्या विकास कामांपेक्षा अधिक गतीने काम हाेतील. अन्यथा, शहराचा विकास थांबवला जाईल. आगामी काळात अडचणी निर्माण केल्या जातील अशा धमक्याच दिल्या जात आहेत. परंतु या प्रकाराला आपण बळी पडणार नाही. शिवसेनेतच राहणार असल्याचे महापाैरांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...