आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम रेल्वेने कोरोनापासून बंद केलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ही गाडी कोरोनामुळे बंद करण्यात आली होती. मात्र, आता ही गाडी सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांना सोय होणार आहे.
गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ मिनिटांनी भुसावळ स्थानकात पोहचेल. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर आता ९ जून पासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सुरत स्थानकात पोहोचेल.
भुसावळ-सुरत पॅसेंजरचे आरक्षण सुरू
रविवारपासून गाडी क्रमांक १९००६ या भुसावळ-सुरत पॅसेंजरचे आरक्षित डब्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. या गाडीमुळे जळगाव, भुसावळसह खान्देश व विदर्भातील अमरावती, मलकापूर, नांदुरा, अकोला, शेगाव तसेच मध्य प्रदेशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमाने व सर्वसामान्य प्रवाशांची सोय झाली आहे. तसेच सुरतमधे राहणारे खान्देशातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
असे आहेत गाडीचे थांबे
गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल, तर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१० तर ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ मिनिटांनी भुसावळ स्थानकात पोहचेल.
तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेल. त्यानंतर ही गाडी जळगाव स्थानकात रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५ तर दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता ही गाडी सुरत स्थानकात पोहोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.