आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांची सोय:सुरत-भुसावळ पॅसेंजर उद्यापासून; आरक्षणही झाले सुरु

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम रेल्वेने कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून बंद केलेली रात्रीची सुरत-भुसावळ पॅसेंजर गाडी ८ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी सुरू होत असल्याने खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह चाकरमानी व सर्वसामान्य प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर होणार आहे. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहाेचणार अाहे. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सुरत स्थानकात पोहोचणार अाहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

खान्देशातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार
रविवारपासून गाडी क्रमांक १९००६ या भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या आरक्षित डब्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे. या गाडीमुळे जळगाव, भुसावळसह खान्देश व विदर्भातील अमरावती, मलकापूर, नांदुरा, अकोला, शेगाव व मध्य प्रदेशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसह व सर्वसामान्य प्रवाशांची माेठी सोय झाली आहे

गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर : ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०, भुसावळ ७.५५ वाजता पोहोचल.

गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर : ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५, सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...