आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:देशभरात जंगलातील प्राण्यांच्या प्रजातींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैवविविधता, लुप्त प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्यकशास्त्र, अवकाशीय मॉडेलिंग, इकोडेव्हलपमेंट, इकोटॉक्सिकोलॉजी, हॅबिटॅट इकोलॉजी आणि हवामान बदल या संदर्भातील अभ्यासाच्या क्षेत्रात वन्यजीव संशोधनाचा कार्यक्रम गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे. त्यात जळगावच्या वन्यजीव संरक्षण संस्थेचे मत्स्य आणि वन्यजीव अभ्यासक गौरव शिंदे यांची वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (WII)मध्ये रिसर्च बायोलॉजिस्ट म्हणून निवड झाली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त नैसर्गिक संसाधन सेवा संस्था म्हणून डब्ल्यूआयआयचे काम सुरू आहे. डब्ल्यूआयआयकडे संशोधन सुविधा आहे. ज्यात फॉरेन्सिक्स, रिमोट सेन्सिंग, जीआयएस प्रयोगशाळा, हर्बेरियम आणि इलेक्ट्रॉनिक लायब्ररी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय व्याघ्रगणना किंवा अखिल भारतीय व्याघ्र अनुमान या विभागांद्वारे केले जाते आहे. डेहराडून येथे असलेल्या संस्थेत दक्षिणेकडील जंगलांच्या जवळ १८० एकरमध्ये या संस्थेचा कॅम्पस आहे. गौरव शिंदे गेल्या पाच महिन्यांपासून तेथील तज्ञांसोबत संशोधन करत आहे. राज्यातून सहा वन्यजीव प्रेमींची निवड करण्यात आली आहे. खान्देशातून एकमेव गौरवची निवड करण्यात आली. गौरव हा वन्यजीव आणि मत्स्य अभ्यासक आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. गेल्या पाच महिन्यात संशोधक डॉ. झाला, कमर कुरेशी यांच्यासोबत गौरव काम करत आहे. त्याने राजाजी नॅशलन पार्क (उत्तराखंड), रणथंबोर नॅशलन पार्क, कुंभलगड वाइल्डलाइफ सेन्चुरी (राजस्थान) येथे सर्वेक्षण केले आहे. १५ मेपासून ताडोबा येथे अभ्यास सुरू करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...