आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा भांड यांना 'सूर्योदय मराठी साहित्य भूषण' पुरस्कार जाहीर:आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या 11 पुरस्कारांसह अनेक मानाचे सन्मान

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या एकोणीसव्या वर्धापनदिनामित्त सुप्रसिद्ध लेखक , महाराष्ट्र राज्य साहित्यआणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड (औरंगाबाद) यांना बाराव्या वर्षाचा अखिल भारतीय दलुभाऊ जैन सूर्योदय मराठी साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सूर्योदय मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे.

21 हजार रुपये रोख, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी अनुराधा पाटील, प्रा. डाॅ. सदानंद मोरे, प्रा. डाॅ. पद्मश्री यू.म.पठाण, गिरिजा कीर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मंगला गोडबोले, वसंत आबाजी डहाके, भारत सासणे, महाकवी सुधाकर गायधनी, प्रेमानंद गज्वी, प्रभा गणोरकर या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. पुरस्कार प्रदान सोहळा येत्या नोव्हेंबरमध्ये नाशकात एक दिवसीय राज्यस्तरीय एकोणीसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.

123 ग्रंथ संपदा प्रकाशित

महाराजा सयाजीराव यांच्या संदर्भात कादंबरी, चरित्र इतिहास, किशोर कादंबऱ्या, बालकथा संग्रहाची एकूण 36 पुस्तके प्रकाशित असून यातील 5 हिंदी, 2 कन्नड, 7 इंग्रजी भाषेत भाषांतरे झाली आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या नावावर आज मितीस 123 ग्रंथ संपदा प्रकाशित असून त्यात कादंबरी, कथासंग्रह, प्रवासवर्णन, ललित लेख संग्रह, आरोग्य, अनुवाद, संपादने, किशोर साहित्य, बालकथा संग्रह, एकांकीका, नवसाक्षरांसाठी अशी ग्रंथ संपदा प्रकाशित आहेत.

अनेक मानाचे पुरस्कार

साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचे 11 पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, दमाणी पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...