आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:सुशांतसिंह याच्या आत्महत्येचा धसका; मुलाने संपवले जीवन

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त पाहून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पाडळसरे येथील १५ वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

चंदन विजय पाटील (१५) असे या मुलाचे नाव असून सदर घटना घडली तेव्हा पाऊस झाल्याने मुलाचे आई वडील शेतात कापूस लागवडीसाठी शेतीकामाला गेले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घराजवळ राहणारा दीपक पाटील हा त्याच्या घरी आल्यावर त्याच्या निदर्शनास ही घटना आली. त्याने तत्काळ पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी कुलरवर चढून गळफास घेतलेल्या चंदनाचा मृतदेह खाली उतरवून त्यास त्याच्या कपड्याची झडती घेऊन काही सुसाइड नोटतर नाही ना ? याचा शोध घेतला. मात्र घटनास्थळी काहीच मिळून आले नाही.

पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चंदन इयत्ता नववीच्या वर्गात कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तो सगळ्यात लहान होता व शाळेसह गावात हुशार व शांत मुलगा होता. अंत्यविधीसाठी शिक्षकही उपस्थित होते. पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलिसात सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस सर्व बाजू तपासून पाहत असून त्यादृष्टीने इतरांची चौकशी करत आहेत.

दिवसभर टीव्हीवर सुशांतची बातमी पाहिली

चंदन याने दिवसभर टीव्हीवर सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेचे वृत्त पाहून त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्नात जीव दिला, अशी दिवसभर सर्वत्र चर्चा होती. त्याच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...