आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारेंची अखेर ऑनलाईन सभा:म्हणाल्या - माझ्याकडे पन्नास खोके नाही, कष्टाची भाकरी खाते, तरीही गुलाबभाऊ का घाबरता?

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''माझ्याकडे पन्नास खोके नाही. माझ्याकडे कसलीही यंत्रणा नाही. वाळूचे गुत्ते नाही ना.. दारूचे हातभट्टीचे गुत्ते. मी कष्टाची भाकरी खाते, गुलाबराव पाटलांसारखे वाय प्लस सुरक्षाही नाही. पण, हे लोक किती घाबरले आहेत का घाबरत आहेत असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केला.

प्रकृती अस्वास्थानंतरही सुषमा अंधारे यांनी आज रात्री 10 च्या सुमारास ऑनलाईन सभा घेतली. त्यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले.

हीच आपली ऑनलाईन सभा

सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्ही हे समजा की, हीच आपली ऑनलाईन सभा आहे आणि मला ती गनिमी काव्याने करणे भाग आहे. तुम्ही विचार करा की, चिथावणीखोर आयपीसी सेक्शन 153 (A) कधी लागू होऊ होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याने दंगल किंवा दंगलसदृष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते.

भाजपचे पेड ट्रोलर

सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्या भाषणाने तशी परिस्थिती कुठेही झाली नाही. तरीही गुलाबराव पाटील यांनी सत्तेचा गैरवापर केला. त्याच काळात भाजपचे पेड ट्रोलर आले. आणि त्यांनी सांगायला सुरूवात केली की, मी सरदार वल्लभाई पटेल आणि इतरांवर बोलले. पण मंदबुद्धींच्या भक्तांना कोण सांगणार की, पंधरा वीस वर्षांपूर्वी माझ्या काॅलेजकाळातील स्पर्धेचे व्हिडीओ आता समोर आणले जात आहेत. वक्तृत्व स्पर्धेत एकाने एकाने विरोधात दुसऱ्याने विरोधात बोलायचे.

गिरीश महाजनांचा फायदा

सुषमा अंधारे म्हणाल्या, गुलाबराव पाटलांकडून सत्तेचा वापर सुरू आहे. ते वाय प्लस सुरक्षा घेऊन का फिरत आहेत. त्यांना एवढी भिती वाटत आहे का? गुलाबराव पाटलांनी सभा होऊ दिली नाही यामुळे गिरीश महाजनांचा फायदा होणार आहे. त्यांनी गुलाबरावांचे आभार मानावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडली. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ झाल्या. त्यांचा रक्तदाबही कमी झाल्याची प्राथमिक आहे. यानंतर लगेच डॉक्टरांच्या पथकाने त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये तपासणी केली व उपचार केले.

सुषमा अंधारे आक्रमक

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर सुषमा अंधारे या आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही स्थितीत सभा घेणारच आहोत असे ठणकावले होते पण त्यानंतर येथील एका हाॅटेलमध्ये त्यांच्याभोवती साध्या वेशातील पोलिसांचा गराडा आहे. त्यांना नजरकैदेत ठेवल्याचेही बोलले जात आहे.

ऑनलाईन सभा घेणार

अंधारे म्हणाल्या, महाप्रबोधन यात्रेवरून पोलिसांचा माझ्यावर आक्षेप नाही. मी सभेत कुठल्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला नाही. असंसदीय भाषेचा वापर केला नाही परंतु, माझ्या सभांवर बंदी घालणे अयोग्य आहे. मी ऑनलाईन सभा घेणार आहे.

गुलाबराव पाटील घाबरले

सुषमा अंधारे म्हणाल्या, गुलाबराव पाटील घाबरले आहेत. ते बिथरले आहेत. ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी स्वःत सांगितले की, आम्ही सभेवर बंदी घालू शकतो तसा आमचा दरारा आहे असे ते म्हणाले होते.

गुलाबरावांकडून गुंडगिरी

सुषमा अंधारे म्हणाल्या, पालकमंत्री पदाचा गैरवापर करीत असून सत्तेचाही गैरवापर ते करीत आहेत. त्यांचा दरारा, त्यांची गुंडगिरी हे सगळे ते लोकांसमोर मान्य करीत आहेत परंतु, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र, या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ते सत्तेसाठी आंधळे झाले आहेत.

फडणवीस सत्ताधाऱ्यांची बाजू घेताहेत

सुषमा अंधारे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मी कुणाबद्दलही सत्तेसाठी आकस बाळगणार नाही किंवा ममत्व बाळगणार नाही हे बोलले परंतु ते सत्ताधाऱ्यांची बाजू घेत आहेत, जाणीवपूर्वक विरोधकांचा आवाज दाबत आहेत.

बातम्या आणखी आहेत...