आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारेंचा अण्णा हजारेंवर आरोप:म्हणाल्या - त्यांचे जनलोकपाल आंदोलन फक्त सरकार उलथवून टाकण्यासाठीच होते

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले असून, सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केले, असा आरोप केला. आंदोलन करणारे अण्णा हजारे आज प्रश्न असतानाही चकार शब्द बोलत नाहीत, अशीही टीका त्यांनी आज केली.

चोपडा येथे महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे या जळगाव दौऱ्यावर आहेत. आज चोपडा येथे सभेसाठी आले असताना सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या.

संविधानाच्या चौकटीबाहेरची मागणी

सुषमा अंधारे म्हणाल्या, ण्णा हजारे लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही.

आंदोलनाचा फायदा कुणाला?

सुषमा अंधारेंनी आरोप केला की​​,​ संवैधानिक चौकटीत सत्ता विकेंद्रिकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लोकपाल आंदोलन सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एकहाती सत्ता देण्यावर भर देणारे होते. अर्थात चौकटीच्या बाहेरचे होते.

ते चकार बोलत नाही

सुषमा अंधारे म्हणाल्या, आज एवढे प्रश्न आहेत तरीही अण्णा हजारे त्यावर चकार शब्द बोलत नाहीत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिघे विभक्त असावे, ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांवर लोकपाल बसवला जातो, तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो.

लाट तयार झाली

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, अण्णा हजारेंचे लोकपाल आंदोलन केवळ तत्कालीन सरकार उलथवून लावायचे. लोकांमध्ये संभ्रमावस्था तयार करायची आणि एक लाट तयार करायची यासाठीच होते. लोकपाल आंदोलनातील त्रुटी ज्या होत्या त्या कधीच दाखवल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...