आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाॅलिटिकल सर्च ट्रेंड मध्ये सुषमा अंधारेंची आघाडी

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रबाेधन यात्रेनिमित्त जिल्हा दाैऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा जिल्हा दाैरा चांगलाच गाजला. गेल्या दाेन दिवसांत गुगलच्या सर्च ट्रेंडमध्ये चर्चेत असलेल्या राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांत सुषमा अंधारे आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठाेपाठ पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, विराेधी पक्षनेते अजित पवार, आमदार एकनाथ खडसे आणि आमदार आदित्य ठाकरे हे नेते गुगलवर पाॅलिटिकल सर्चमध्ये चर्चेत आहेत.

या सरत्या आठवड्यात जिल्हा दाैऱ्यावर आलेल्या सुषमा अंधारे जिल्ह्यातील चार आक्रमक सभांमुळे चर्चेत आहेत. हायव्हाेल्टेज पाॅलिटिकल ड्रामा ठरलेल्या धरणगाव आणि मुक्ताईनगर येथील उपनेत्या अंधारे यांची आॅनलाइन सभा खूपच चर्चेत राहिली. या सभेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष जळगावकडे केंद्रित राहिले. या सभेच्या निमित्ताने पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटीलही चर्चेत राहिले. याचवेळी सिल्लाेड येथील आमदार आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली. दुसरीकडे शिर्डीत आयाेजित राष्ट्रवादीच्या शिबिरात विराेधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार एकनाथ खडसे यांची भाषणेही चर्चेत हाेती. त्यामुळे गेल्या दाेन दिवसांत पाच राजकीय नेत्यांचा गुगलवर सर्च ट्रेंड जाेरात हाेता. त्यात अन्य नेत्यांच्या तुलनेत सुषमा अंधारे मात्र महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही खूपच आघाडीवर आहेत.

गुलाबरावांचा बिहार तर खडसेंचा दिल्लीत सर्च
गेल्या दाेन दिवसांत चर्चेत असलेलमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत सर्वाधिक सर्च बिहारमधून झाला. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक येथून त्यांचा शाेध घेण्यात आला. शिर्डीत आमदार एकनाथ खडसे काय बाेलले? याबाबत दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, बिहार येथून सर्च झाले आहेत. विराेधी पक्षनेते अजित पवारांबाबत उत्तर प्रदेश, प.बंगाल, सिक्कीम येथून सर्च अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...