आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोबत आलेल्यांना सेट करू,विरोधात गेल्यास शूट करू:भाजपची निती क्लेषकारक, सुषमा अंधारेंची टीका, म्हणाल्या- शिरसाठ स्वगृही येतील

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाकडून सुरु असलेले सुडाचे राजकारण जनतेसमोर उलगडण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढली आहे. सोबत आलेल्यांना सेट करु, विरोधात गेला तर शूट करु ही भाजपची निती क्लेषकारक आहे. भारतीय लोकशाहीला घातक असल्याची टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली.

परतीचे दोर कापलेले नाहीत

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदेंसाेबत गेलेल्यांना कधीच शत्रू म्हटलेले नाही. कधी कधी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो. कधी कधी माणसे बेईमान होतात. कधी तरी त्यांना चुका कळतील. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत.

शिरसाठ परत येतील

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदेंसोबत गेलेल्यांपैकी सर्वप्रथम परत येणारे आमदार संजय शिरसाठ असतील. ते प्रचंड अस्वस्थ आहेत.परेशान आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. औरंगाबादमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांना मंत्रीपदे देवून शिरसाठांच्या मंत्रीपदाची आशा मावळली. कार्यकारीणी पदे जाहीर झाली.त्यातही त्यांना स्थान मिळाले नाही. सर्वाधिक पश्चात त्यांना होतोय. शिरसाठ उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमय्यांची इडीशी चांगली ओळख

अंधारे जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. जळगाव जिल्ह्यात कोविड काळात वैद्यकीय सुविधा देण्याबाबतचे टेंडर्स निघाले. त्यात झालेल्या अपहाराची पोलिस तक्रार दाखल आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांची इडीशी चांगली ओळख आहे. लहान बहीण म्हणून त्यांना विनंती करते. कोविड काळात झालेला अपहाराकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. पाचोऱ्यातील सात ते आठ प्लॉट आरक्षीत केले होते. कोवीड काळात त्यावरील आरक्षण काढून कायदेशीर प्रक्रिया केली जात नसेल हा 207 कोटींचा व्यवहाराकडेही लक्ष द्यावे. त्यांचा सदसदविवेक जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रश्नांमध्ये सोमय्या मदत करावी.

सोमय्यांची पटशिष्य होईल

अनिल परब यांच्या बंगल्याकडे सोमय्यांनी जावे. पंरतु, राणेंच्या आदिश बंगल्याकडे हातोडा घेऊन ते कधी जाणार आहेत. तेथे हातोडा घेऊन गेल्यास त्यांच्या नावाचा गंडा हातात बांधायला तयार आहे. त्यांची पटशिष्य व्हायला तयार आहे.

अमृता फडणवीसांवर टीका

सुषमा अंधारे म्हणाल्या, अमृता फडणवीसांना टोला लगावताना सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या मॉडेल, गायक, समाजसेवक की राजकारणी आहेत, हे अमृता वहिणींनी ठरवावे. त्यांचा स्क्रिझोफिनीश मूड सतत स्विंग करत राहतो.

देवेंद्र फडणवीस कळसूत्री

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गटात जाण्यासाठी बच्चू कडूंना फोन केल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाच्या घडामोडींमध्ये भाजप आणि कळसूत्री सूत्रधार फडणवीस होते,हे सिद्ध होते.

संभाजी भिडेंवर टीकास्त्र

सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजप व्देषमुलक राजकारण पसरवत आहे. संविधानाच्या चौकटीची मोडतोड केली जात आहे. संभाजी भिडे यांनी त्यांच्या वक्तव्याला कितीही हिंदुत्वाचा दर्प दिला तरी व्यक्तीस्वातंत्र्यांची पायमल्ली करणारे आहे. संवैधानिक हक्कभंग करणारे आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली हे व्देषमूलक वातावरण पसरवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...