आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा अंधारे यांचे भाकीत:उद्धवसेनेत सर्वात आधी संजय शिरसाटच परततील, बहिणीने भावाविषयी दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद : शिरसाट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराच्या कपाळावर कुंकू नसल्याबद्दल केलेले वक्तव्य व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली, संवैधानिक हक्कभंग करणारे आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेषाचे वातावरण पसरवत आहे. त्याला प्रत्युत्तरासाठी महाप्रबोधन यात्रा काढली आहे, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. उद्धवसेनेत सर्वात आधी परतणाऱ्या आमदारांमध्ये पहिला क्रमांक संजय शिरसाट यांचाच असेल, असे भाकीतही त्यांनी केले.

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्या बंगल्याकडे जावे. परंतु राणेंच्या अधीश बंगल्याकडे हातोडा घेऊन कधी जाणार आहात? दरम्यान, अंधारेंच्या वक्तव्याविषयी शिरसाट म्हणाले की, उठाव करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा नव्हे, तर माझ्यासह ४० आमदारांचा होता. त्यामुळे त्यांना सोडून परतण्याचा प्रश्नच येत नाही.

परतीचे दोर कापलेले नाहीत शिंदेंसाेबत गेलेल्यांना कधीच शत्रू म्हटलेले नाही. सध्या प्रचंड अस्वस्थ, परेशान असलेले संजय शिरसाट सर्वप्रथम उद्धवसेनेत परतणारे पहिले आमदार असतील. मंत्रिपदाची आशा मावळल्याने त्यांना सर्वाधिक पश्चात्ताप होतोय. ते आमच्या संपर्कात असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...