आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह छावातर्फे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक जिल्ह्यातील एका जाहीर सभेत हिंदू देवी-देवता व राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादी, भाजप छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्या निषेधार्थ बुधवारी छावा मराठा युवक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, भीमराव सोनवणे, भाजपचे पांडुरंग काळे, योगेश काळे, राहुल लष्करे व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक व पंडित नेहरू या राष्ट्रपुरुषांविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी इतरही अनेक भाषणांमधून हिंदू देवी-देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. बाळासाहेब ठाकरे व अण्णा हजारे यांची नक्कल केली. अशा वक्तव्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढे असे वक्तव्य करू नये असे सूचित करण्याची मागणी निवेदनातून केली.

बातम्या आणखी आहेत...