आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:शहरात पुन्हा तीन गाेवर संशयित; नऊ भागात सर्व्हे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुरुवारी गाेवर संशयित तीन बालके समाेर आली. त्यांच्या अंगावर पुरळ आढळून आल्या. महापालिकेच्या आशा कर्मचारी यांच्या माध्यमाने केला जाणाऱ्या सर्वेक्षणात हे नवीन संशयित समाेर आले. विशेष म्हणजे यातील दाेन रुग्ण हे प्रतापनगर भागातील एकाच घरातील आहेत. तिसरा रुग्ण तांबापुरा भागातील आहे.

शहरात गाेवर साथीचे संशयित दाट वस्तीत आढळून आल्याने पालिकेतर्फे या नऊ भागात सर्व्हे करुन संशयितांचा शाेध घेऊन त्यांच्या लाळ व रक्ताचे नमुने घेतले जात आहे. आतापर्यंत ६५ संशयित समाेर आले आहेत. त्यांचे नमुने अहमदाबाद येथील प्रयाेगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत. गुरुवारी पालिकेच्या नविपेठ हेल्थ पाेस्ट अंतर्गत जिल्हापेठ हद्दीतील प्रतापनगरातील एकाच घरातून पाच व तीनवर्षीय बालकांच्या अंगावर पुरळ उठल्याचे आढळले.

बातम्या आणखी आहेत...