आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Two Juvenile Suspects Who Killed A 22 year old Youth Of Bhadli Are In The Custody Of The Police The Second Incident In A Week Has Shaken The District!

तो बहिणीला त्रास देत होता म्हणून कायमचाच संपवला!:22 वर्षाच्या तरुणाचा दोन अल्पवयीनांकडून खून, पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहा दिवसांपूर्वी भादली-कडगाव रस्त्यावर पाटचारीजवळ 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयित रित्या आढळून आला हाेता. या प्रकरणी भादली येथील दाेन अल्पवयीनांना पाेलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. आठवडाभरात अल्पवयीनांनी केलेली ही दुसरी हत्या असल्याने जिल्हा हादरला आहे.

नशिराबाद पाेलिस ठाण्याच्या हद्दीत भादली- जुना कडगाव रस्त्यावर पाटचारी लागून असलेल्या शेतात एका तरुणाचा मृतदेह चिखलाने माखलेला पडलेला होता. याची माहिती भादलीच्या पाेलिस पाटील राधिका ढाके यांनी दिल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला.

याप्रकरणी मृत संदेशची शेतीकाम करणारी आई छायाबाई लीलाधर आढाळे (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भा.द.वी. कलम 302 व 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती.

नाशिराबाद पाेलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक अनिल माेरे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास केला असता मृत हा भादली येथील संदेश लिलाधर आढाळे (वय 22) येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर पाेलिस उपनिरिक्षक राजेंद्र सांळुके, रवींद्र इंधाटे, किरण बाविस्कर या पथकाने अधिक चाैकशी केल्यावर मृताचे घटनेच्या दिवशी माेबाईलवर सर्वात शेवटी कुणाशी बाेलणे झाले, याची माहिती घेतली.

यानंतर तपासाात भादली येथील दाेन विधीसंघर्ष (अल्पवयीन) बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी केली असता मृत संदेश आढाळे हा बहिणीला त्रास देत हाेता. या कारणामुळे त्याला आम्ही ठार मारले असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व गुन्ह्याच्या वेळी अंगावर असणारे कपडे पाेलिसांनी जप्त केले आहे. या अल्पवयीनांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.

चाेपड्याच्या घटनेतही अल्पवयीन

चाेपडा येथे कुटुंबाला मुलीचे प्रेमसंबध मान्य नसल्याने मुलीच्या चार भावांनी मिळून तरुणाचा गावठी पिस्तुलने गाेळ्या झाडून खून केला. तसेच बहिणाचा रुमालाने गळा आवळला. यात दाेन अल्पवयीन भावांचा सहभाग हाेता. या घटनेला पाच दिवस उलटत नाही ताेच गेल्या बुधवारी घडलेल्या खूनाच्या घटनेतही दाेन अल्पवयीन मुलांचा सहभाग समाेर आला.

बातम्या आणखी आहेत...