आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुक्त मुलांना सायटोकाइन स्टॉर्मची लक्षणे; निदान लवकर न झाल्यास वाढतो धोका, पाच टक्के मुलांना होतोय हृदयाचा त्रास

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिंताजनक : अँटिबाॅडीजमधून हाेताे आजार

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत माेठ्यांसाेबतच लहान मुलांनाही संसर्ग हाेण्याचे प्रमाण वाढले अाहे. काेराेनातून बरे झालेल्या लहान मुलांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबाॅडीजच्या माध्यमातून काही गंभीर अाजार हाेण्याची शक्यता वाढली अाहे. याला सायटाेकाइन स्टाॅर्म अथवा मल्टी सिस्टिम इन्फ्लेंमेटरी सिंड्राेम म्हटले जात अाहे. यात हृदय अाकुंचन पावण्याची क्षमता मंदावते. पाच टक्के मुलांमध्ये लक्षणे अाढळत असून नुकतेच दाेन मुले यातून सुरक्षितरीत्या बाहेर पडली अाहेत.

काेराेनाच्या महामारीत अनेकांना जीव गमवावा लागत असून संसर्ग हाेणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली अाहे. तरूणांसह वृध्दांपर्यंत असलेले हे प्रमाण अाता लहान मुलांमध्येदेखील वाढले अाहे. संसर्ग झाल्यानंतर त्यातून बरे हाेण्याचे प्रमाणही भरपूर अाहे. दरम्यान काेराेनातून बरे झालेल्या १५ वर्षांखालील मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचे अाजार त्यांच्यात उद्भवू शकतात. एमअायएससी (मल्टी सिस्टिम इन्फ्लेमंेटरी सिंड्राेम) हा तसाच एक अाजार असून त्याचे लक्षणे असलेली मुले उपचारासाठी दाखल हाेऊ लागल्याचे बालराेगतज्ञ डाॅ. अविनाश भाेसले यांनी सांगीतले. दरम्यान, सायटाेकाइन स्टाॅर्मची लक्षणे अाढळताच डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर तत्काळ उपचार करता येणे त्यावर शक्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दाेघा बालकांवर यशस्वी उपचार
जळगाव व भुसावळ शहरातील प्रत्येकी ८ वर्षांचा मुलगा व ९ वर्षांच्या मुलीवर नुकतेच चिरायू हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यात अाले. यात या लहान मुलांना हृदय अाकुंचन क्षमता मंदावल्याने बेशुध्द अवस्थेत दाखल करण्यात अाले हाेते. तर मुलीचा रक्तदाब कमी हाेऊन हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांना सूज अाली हाेती. या दाेघा बालकांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात अाला. पालकांनी काेराेनातून बरे झालेल्या मुलांमध्ये दाेन ते चार अाठवड्यात लक्षणे अाढळल्यास डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डाॅ. भाेसले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगीतले.

चिंताजनक : अँटिबाॅडीजमधून हाेताेय अाजार
काेराेना संसर्गानंतर शरीरात ज्या अँटिबाॅडीज तयार हाेतात. त्यातूनही मुलांना काही गंभीर अाजार हाेऊ शकतात. एमअायएससीमध्ये राेगप्रतिकारक शक्ती वाढते पण तीच राेगप्रतिकारशक्ती शरीराच्या विराेधात काम करते. साधारणत: १५ वर्षांखालील मुलांमध्ये अशा केसेस अाढळतात. काेराेनातून बरे झालेल्या लहान मुलांपैकी ५ टक्के मुलांमध्ये ही लक्षणे अाढळतात असे डाॅक्टरांचे म्हणणे अाहे.

अशी अाहेत अाजाराची लक्षणे
एमअायएससी अाजारात लहान मुलांमध्ये डाेळे लाल हाेणे, अंगावर लाल पुरळ येणे, अंगावर सूज येणे, तीव्र ताप येताे. डाेके दुखते. जुलाब व उलट्या हाेतात. पाेटात दुखते. अाैषध देऊनही ताप कमी हाेत नाही. रक्तदाब कमी हाेताे व हातपाय थंड पडतात अशी लक्षणे अाहेत.

बातम्या आणखी आहेत...