आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जामोद येथील काही लोकांनी जुन्या वादातून अश्लील व जातीवाचक शिविगाळ केली. तसेच मारहाण करून लुटले. परंतु स्थानिक पोलिसांनी आरोपींशी संगनमत करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार करमोडा येथील रणजितसिंग दगडू डाबेराव यांनी २८ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. सात दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मागील १४ फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जामोद येथील बस स्टॉप वरील गावंडे यांच्या दुकानासमोर संजय दलाल, प्रतिक ढगे, आकाश ढगे, वैभव ढगे, राजू दलाल व इतर पंधरा ते विस लोकांनी जुन्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व लोखंडी पाईप, तलवार, फायटर व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे. तसेच पॅण्टच्या खिशातील रोख १८०० रुपये जबरीने काढून घेतले. यावेळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून वरील लोकांच्या तावडीतून माझी सुटका केली. घडलेला प्रकार हा बस स्टँड जामोद येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो असता, तेथील चौधरी नामक पोलिस अधिकारी व गव्हाळे बीट जमादार जामोद व समाधान दामधर यांनी मलाच अश्लील भाषेत शिविगाळ करून व जबरदस्तीने आपसनाम्यावर सह्या करण्यास भाग पाडले. त्यामुळे भविष्यात वरील गैरअर्जदारापासून मला व माझ्या कुटुंबास धोका निर्माण झाला आहे. तसेच ज्या व्यक्तींनी वरील गैरअर्जदाराच्या तावडीतून माझी सुटका केली आहे, त्यांच्या जीवितास सुध्दा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रणजीतसिंह डबेराव यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.