आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याची दैना दूर करा : जिल्हाधिकारी राऊत

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थील भुईकोट किल्याची झालेली दुरावस्था सुधारुन किल्ल्याचे संवर्धन करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली.

किल्ल्याची डागडुजी करून भिंतींवर उगवलेली झाडे, दरवाजाची दुरावस्था, किल्ल्याची आतून व बाहेरून साफसफाई, ड्रेनेजची व्यवस्था, किल्ल्यात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, पावित्र्य जपावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत. बैठकीला पारोळ्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी जयश्री भगत, कार्यकारी अभियंता प्रशांत जुवेकर, हिंदू जनजागृती समितीचे डॉ.अभय रावते, किल्ला संवर्धक राजश्री देशपांडे (धुळे) निखिल कदम या हजर होते. किल्ल्याच्या संवर्धनाबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी मते मांडली. तसेच उपाययोजनांची दिशा ठरवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...