आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

123 शाळा झाल्या सहभागी:पाळधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ; माध्यमिक गटात धीरज पाटील प्रथम

पाळधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव पंचायत समितीचा शिक्षण विभाग व भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पसतर्फे ४९वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जीपीएस कॅम्पस येथे झाले. यात तालुक्यातील १२३ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध प्रकल्प सादर केले. प्रदर्शनात प्राथमिक गटात अयान खाटीक, माध्यमिक गटात धीरज पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

प्रदर्शनाचे उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे प्राचार्य अनिल झोपे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, जीपीसचे कार्यकारी संचालक प्रतापराव पाटील, पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, मुख्याध्यापक डी. डी. कंखरे उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी केले. परीक्षण डी. ए. धनगर, संजय पाटील, आर. सी. कोळी यांनी केले. ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन, नाना पाटील यांनी अाभार मानले.

बातम्या आणखी आहेत...