आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी पूर्ण:दूध संघ निवडणुकीसाठी तालुकानिहाय मतदान केंद्र ; जळगाव येथे असणार सुविधा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १० डिसंेबर रोजी मतदान होणार असून, ११ डिसंेबर रोजी मतमाेजणी होणार आहे.तालुकानिहाय मतदान केंद्रानुसार जळगाव व जामनेर तालुक्यासाठी रिंगरोडवरील संगम सोसायटीतील सत्यम हॉलमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान केंद्रावर जळगाव व जामनेर तालुक्यातील ५७ मतदार मतदान करतील.

अमळनेर व चोपडा तालुक्यातील ७८ मतदार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मतदान केंद्रावर मतदान करतील. भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील ४४ मतदार भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूल जामनेररोड या मतदान केंद्रावर मतदान करतील. एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यातील ६७ मतदार एरंडोल येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतील मतदान केंद्रात मतदान करतील. रावेर व यावल तालुक्यातील ६० मतदार फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावतील. पाचोरा व भडगावचे ७६ मतदार पाचोरा येथील गो.से. हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदान करतील. त्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...