आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यंदा परीक्षेत प्रथमच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेची काठिण्य पातळी अधिक होती; मात्र तरी देखील निकालात घसरण झाली नसून शहरात दहावी परीक्षेत सेंट जोसेफ विद्यालयाची तनिष्का दिनेश अग्रवाल ही विद्यार्थीनी ९९.२ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे तर बारावी परीक्षेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी तनया पाटील ही ९६.२० टक्के गुणांसह अव्वल आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बोर्ड परीक्षेच्या प्रश्नांच्या पॅटर्नमध्ये यंदा बदल करण्यात आला होता. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्तेवर आधारित अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. बोर्ड परीक्षेत क्षमता आधारित प्रश्नांची संख्या सुमारे ४० टक्के आणि बारावीत ३० टक्के होती. हे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये विचारण्यात आले होते. यंदा प्रथमच हा बदल करण्यात आल्याने काही विद्यार्थी गोंधळले होते. याशिवाय रचनात्मक प्रतिसाद वेळ, प्रतिपादन आणि तर्क आणि केस आधारित प्रश्न देखील विचारण्यात आले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित शाळा केल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा अवघड वाटली नाही परिणामी निकालही चांगला लागला त्या तुलनेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग न केल्याने व कोरोना काळात अभ्यास मागे पडल्याने या वर्षाचा निकाल घसरल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.