आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गृहनिर्माण साेसायट्यांनाही तंटामुक्ती पुरस्कार‎ ; रेन वाॅटर हार्वेस्टिंगच्या आधारावर मिळतील 100 गुण‎

जळगाव‎ / सुधाकर जाधवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ सहकारी गृहनिर्माण सोसायटींमधील‎ आपापसातील तंटे सोडवून‎ सुव्यवस्थापनासाठी सहकार‎ विभागातर्फे सुव्यवस्थापन व‎ तंटामुक्त सोसायटी अभियान‎ राबवण्यात येत आहे. संस्थेचे‎ कामकाज अधिनियम, मंजूर‎ उपविधीनुसार, मनपा कर भरणा,‎ परिसर स्वच्छता व सुशोभिकरण‎ अशा विविध मुद्द्यांवर १०० गुणांचे‎ मूल्यांकन करण्यात येईल. त्यानुसार‎ पुरस्कार जाहीर हाेईल.‎ सहकार आयुक्त अनिल कवडे‎ यांनी हे अभियान राबवण्याचे आदेश‎ दिले आहेत.

सहकारी गृहनिर्माण‎ सोसायटींमधील आपसी तंटे‎ सोडवून सुव्यवस्थापनासाठी‎ सहकार विभागातर्फे सुव्यवस्थापन‎ व तंटामुक्त संस्था अभियान‎ राबवण्यास या वर्षापासून प्रारंभ ‎ ‎ करण्यात आला. त्यासाठी विविध ‎ ‎ मुद्द्यांवर १०० गुणांचे मूल्यांकन ‎ ‎ करण्यात येईल. सुव्यवस्थापन ‎ ‎ मोहिमंेतर्गत उत्कृष्ट‎ कामकाजाबाबत विविध मुद्द्यांवर‎ सोसायटींचे मूल्यमापन करून‎ उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या‎ गृहनिर्माण सहकारी संस्थांची निवड‎ करण्यात येणार आहे. गृहनिर्माण‎ संस्थांचा सहभाग ऐच्छिक आहे.‎ सहायक निबंधक, उपनिबंधक‎ त्यांच्या स्तरावर सहकार खात्याचे‎ अधिकारी, वैधानिक लेखापरीक्षक‎ यांची समिती गठीत करतील.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

मोहिमंंेतर्गत नाव नोंदवणाऱ्या‎ गृहनिर्माण संस्थांना तालुका,‎ वॉर्डस्तरावर २००पेक्षा कमी सभासद‎ असणाऱ्या संस्थांना पहिला, दुसरा‎ व तिसऱ्या क्रमांकासाठी तसेच‎ २००पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या‎ संस्थांची निवड करण्यात येईल.‎ उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या‎ संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रशस्तिपत्र‎ व मानचिन्ह देण्यात येईल. सहकार‎ विभागाशी संपर्क करावा.‎

दहा उपक्रमांना ३० गुण‎ संस्थेतर्फे राबवण्यात येणारे व‎ नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी ३० गुण‎ देण्यात येतील. पावसाच्या पाण्याची‎ साठवण करणे, कंपोस्टखत,‎ शेतकरी ते ग्राहक योजनंेतर्गत‎ भाजीपाला, धान्य पुरवठा‎ करण्यासाठी संस्थास्तरावर जागा,‎ सुविधा उपलब्ध करून देणे,‎ वाहनतळाचे सुयोग्य पद्धतीने‎ नियोजन, सदस्यांच्या आरोग्याच्या‎ दृष्टीने सोयी-सुविधा उपलब्ध‎ करून दिल्या जातात. कोविड‎ १९साठी तपासणी व उपचारासाठी‎ सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, या‎ उपक्रमांचा समावेश अाहे.‎

असे हाेणार मूल्यांकन‎ संस्थेचे कामकाज अधिनियम,‎ नियम व मंजूर उपविधीप्रमाणे होणे,‎ भोगवटा शुल्काची अाकारणी‎ नियमाप्रमाणे, मासिक देखभाल‎ शुल्काच्या थकीत रकमेवर‎ उपविधीतील तरतुदीप्रमाणे‎ व्याजाची आकारणी करण्यात येते.‎ गृहनिर्माण संस्थांच्या जागेचे‎ हस्तांतरण, मानीव अभिहस्तांतरण‎ करण्यात आलेले आहे.‎ महानगरपालिका कर भरणा,‎ महानगरपालिका, नगरपालिका‎ यांच्यातर्फे सुरक्षिततेच्या दृष्टीने‎ दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी,‎ या मुद्यांवर मुल्यांकन केले जाईल.‎

बातम्या आणखी आहेत...