आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाेबत मिरवणुकीत नाचलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू:चाेपड्याच्या कस्तुरबा विद्यालयात होते क्रीडा शिक्षक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत बसलेल्या गणपती बाप्पाला निराेप देण्यासाठी काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांसाेबत नाचलेल्या चाेपडा येथील क्रीडा शिक्षकाचा जळगावात रस्त्यावर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. विकास पंडीतराव काेष्टी(वय 57) असे या शिक्षकाचे नाव असून ते साेसायटीच्या वार्षिक सभेसाठी जळगावात आले हाेते.

चाेपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात विकास पंडितराव काेष्टी हे पर्यवेक्षक पदावर अाहेत. ते क्रीडा शिक्षक व इंग्रजी विषय देखील शिकवतात. ते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेच्या विसर्जन मिरवणूक काढण्यात अाली. त्यात विद्यार्थी नाचलेत. त्याच्या साेबत काेष्टीसर देखील सहभागी झाले हाेते. त्यानंतर ते ग.स. साेसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने जळगावात एसटी बसने आले.

शाळेचे इतर शिक्षक सुनिल पाटील, विनाेद पाटील कपील बाविस्कर, निलेश पाटील, मदन भाेई, ग्रंथपाल विनाेद पाटील हे खासगी वाहनाने आले. काेष्टी सर सभेला काही वेळ हजर राहून कामानिमित्त जिल्हापेठेतून पायी जात असताना पदमालय भाेजनालयाजवळील विघ्नहर्ता नेत्रालयासमाेरून जात असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते नेत्रालयाच्या पायरीवर बसले. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांची शुध्द हरपली.

यावेळी जवळपासच्या लाेकांनी त्यांना रुग्णालयात नेले. या ठिकाणी डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा जीव गेलेला हाेता. याबाबत जिल्हापेठ पाेलिसांना कळविले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणला व त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचे भाऊ गणेश काेष्टी यांच्याकडे दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह ताब्यात देण्यात आला.

धानाेऱ्याहून परतले इतर शिक्षक

कस्तुरबा विद्यालयाचे इतर पाच सहा शिक्षक हे खासगी वाहनाने आले हाेते. ते सभेला हजेरी लावून परतले हाेते. तर काेष्टी सर हे त्यांना इतर काम असल्याने एकटेच थांबले हाेते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा जीव गेल्याची माहिती मिळाल्याने सर्व शिक्षक परत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले. यावेळी चाेपड्यातील इतर शाळेतील शिक्षकांनीही गर्दी केली हाेती.

मुलगा अभियंता-मुलगी डाॅक्टर

काेष्टी हे चाेपड्यात पाटील गढी भागात राहत हाेते. त्यांना एक मुलगा श्रेयस व मुलगी श्रेया असून मुलगा अभियंता व मुलगी बीएएचएमएस असून दाेघे नाशिक येथे राहतात. त्यांना कळविण्यात आले असून ते चाेपड्याकडे निघाले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...