आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:पूर्वतयारीसाठी शिक्षक शाळेत; शाळा सुरू करण्याबाबत नियोजन

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी शाळेची घंटा वाजली असली तरी शासकीय परिपत्रकानुसार शाळा बुधवारी नियमितपणे सुरू होणार आहेत. सोमवार व मंगळवारी शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारीसाठी शाळेत उपस्थित राहून शाळा सुरू करण्याबाबत नियोजन, तयारी करावी, यात विद्यार्थ्यांना शाळेत सक्ती नसावी, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांची उपस्थिती शाळांत दिसून आली. याचबरोबर शहरातील विविध बहुतांश शाळांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शाळेचा पहिला दिवस अनुभवला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले.

मराठी, सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाने दिले होेते. यात आधी पहिले दोन दिवस शिक्षकांनी शाळेत येऊन पूर्वतयारीनुसार नियोजन करण्याच्या सूचना होत्या. मात्र ओरियन, रायसोनी, वर्धमान, विवेकानंद आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावून आनंद उपभोगला. व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...