आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरु होणार:तज्ञ प्राध्यापकांच्या मागदर्शनासाठी ॲडजंक्ट फॅकल्टीसह शिक्षक देवाण-घेवाण होणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्या परिषदेच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमध्ये सहशिक्षक (ॲडजंक्ट फॅकल्टी) नियुक्त करण्यास तसेच या प्रशाळांमधील विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन (शिक्षक देवाण-घेवाण) उपलब्ध करुन देण्याच्या मार्गदर्शक सूचनांना विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय विद्यापीठात नाट्यशास्त्र विषय सुरु करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीत बऱ्याच विषयांवर चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. विद्यापीठातील प्रशाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांची संख्या कमी आहे ते लक्षात घेता विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कुलगुरु प्रा.माहेश्वरी हे ॲडजंक्ट फॅकल्टी कार्यक्रम राबविण्यासाठी आग्रही होते. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत यासाठीचे मार्गदर्शक सूचनांचा विषय ठेवण्यात आला होता. त्या त्या क्षेत्रातील कौशल्यप्राप्त तज्ज्ञ व्यक्तींचे ऑनलाईन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तींना विद्यापीठात येण्याची गरज भासणार नाही.

या विषयांना मिळाली मान्यता

प्रशाळांमध्ये इतर विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे यासाठी शिक्षक देवाण घेवाण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचा विषय देखील पटलावर ठेवण्यात आला होता. यासाठी प्रा.आर.एल.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा होऊन त्याला मान्यता देण्यात आली.

  • विद्यापीठाच्या कला व ललितकला विभागातंर्गत नाटयशास्त्र हा विषय सुरु करण्यास या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. त्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • पीएच.डी अभ्यासक्रमाच्या मौखिक परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यास मान्यता मिळाली.
  • विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे रुपांतर माध्यमशास्त्र प्रशाळेत करण्यास विद्या परिषदेने मान्यता दिली.
बातम्या आणखी आहेत...