आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गस्तीत पकडलेले सागवान लाकूड, दुचाकी वन विभागाने घेतली ताब्यात

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावल पोलिसांनी गस्तीदरम्यान शहरातील बोरावल रस्त्यावर एक दुचाकी व सागवान लाकडाचे दोन नग वाहतूक करताना पकडले होते. या कारवाईवेळी चोरटी लाकूड वाहतूक करणारे पसार झाले होते. हे सागवान लाकूड आणि दुचाकी वन विभागाने ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध वन गुन्हा दाखल झाला.

सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, अस्लम खान, हवालदार संजय देवरे, भूषण चव्हाण, इशान तडवी हे बुधवारी रात्री बोरावल रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर दोन जण सागवान लाकडाचे दोन भले मोठे कट साईज नग घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी दोघांना थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्यांनी दुचाकी व सागवान लाकूड जागेवर सोडून पळ काढला. यानंतर पथकातील पोलिसांनी पाठलाग केला. पण, अंधारात दोघेही पसार झाले. ही दुचाकी व सागवान लाकूड पोलिसांनी ताब्यात घेत वन विभागाला माहिती दिली होती. आता यावल वन विभागाचे (पूर्व) वन क्षेत्रपाल विक्रम पदमोर यांनी सागवान लाकूड व दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणी वन कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला. कारवाईमुळे लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहे.

बातम्या आणखी आहेत...