आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगावमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे जीव मुठीत धरून काम सुरू असून, वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करताना 3 कर्मचारी जखमी जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळवाऱ्यामुळे पहिल्याच पावसात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ही कामे नेमलेल्या एजन्सीने करावयाचे असून एकही एजन्सी, त्यांचा मनुष्यबळ किंवा ठेकेदार पाठवू शकला नाही. मात्र, या एजन्सी वरिष्ठांच्या आशीर्वादाने अव्वाचा सव्वा बोगस बिले काढत आहे. अपूर्ण साहित्यानिशी शनिपेठ, अयोध्यानगर आदी परिसरात रात्री उशिरापर्यंत चाललेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान महावितरणचे तीन कर्मचारीही जखमी झाले. असे असताना अद्यापही मान्सूनपूर्वची 30 % कामे बाकी आहेत.
कर्मचाऱ्यांची धावपळ
अचानक झालेल्या पावसामुळे रविवारी महावितरण कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली. या कामासाठी नेमलेली कुठलीही एजंसी उपलब्ध न झाल्याने अपूर्ण साधनांसह कर्मचाऱ्यांनी कक्षाचे आठ फीडर बंद झाल्यानंतर ते क्रेनद्वारे आपले काम करावे लागले. एलटी तारा तुटल्याने सोपानदेव व मनुदेवी नगरात काम करताना नितीन पाटील, नीलेश भोसले, हितेंद्र कोल्हे हे तीन कर्मचारी झाडावरून घसरुन पडले. यात नितीन पाटील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने टाके देखील पडले आहेत.
सुरक्षा साधनांचा अभाव
रविवारी रात्री लाइनवरील फॉल्ट शोधत असताना तांत्रिक कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधनांचा अभाव दिसून आला. यात हत्यारे, मोठी टॉर्च हे कोणत्याही तांत्रिक संवर्गातील कर्मचारीकडे नव्हते. अनेक जण मोबाइलच्या उजेडात काम करताना दिसून आले. संघटनेने या पूर्वीच एमआयडीसी परिसर व जळगाव शहरासाठी स्वतंत्र कर्मचारी, मजूर व साहित्यानिशी कंत्राटदार ब्रेक डाऊन व्हॅनची मागणी केली आहे.
कार्यकारी अभियंता रिक्त
जळगाव महावितरणचे कार्यकारी अभियंता पद दीड-दोन वर्षापासून रिक्त आहे. प्रभारींना या पदाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने अनेक प्रशन प्रलंबित आहे. यंदा मान्सूनपूर्व कामेही फसली आहेत. फांद्या तोडण्याच्या मोहिमेचे आदेश उशिरा दिल्याने मुख्य वीज वाहिनींची तेवढी झाडे तोड झाली. मात्र, लघुदाब वाहिन्या व रोहित्र तसेच राहिले आहे.
- सुरेश पाचंगे, राज्य केंद्रीय उपाध्यक्ष अभियंता कर्मचारी संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.