आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी सापळा:2 लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यालाही अटक

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतीच्या 7/12 वर नाव घेण्यासाठी मागितली लाच

शेतीच्या 7/12 वर पत्नीचे नाव टाकण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तदसीलदारासह मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला अटक करण्यात आले आहे. हेमंत भागवत पाटील(वय-40, तहसिलदार बोदवड, तहसिल कार्यालय,जि.जळगाव), संजय झेंडू शेरनाथ( वय-47, मंडळ अधिकारी,बोदवड,तहसिल कार्यालय,जि.जळगाव) आणि निरज प्रकाश पाटील(वय-34, तलाठी बोदवड, तहसिल कार्यालय, जि.जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे 2002 साली बोदवड तहसिलच्या हद्दीत शेत खरेदी केले होते. या शेतीच्या 7/12 च्या उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले होते. नंतर कालांतराने सदर शेतीच्या उताऱ्यावर परत मुळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदाराने मंडळ अधिकाऱ्याला भेटून पुन्हा या शेतीच्या 7/12 उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले.

नंतर या उताऱ्याबाबत तहसिलदार बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली व सदर काढलेली नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात बोदवड यांच्यावतीने संजय शेरनाथ आणि निरज पाटील यांनी तक्रारदारकडे आधी 5 लाख रुपयांची मागणी केली. नंतर तडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम शेरनाथ यांनी शुक्रवार (दि.18) रोजी पंचासमक्ष स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...