आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा नियोजन समितीची बैठक:वाळू माफियांकडून तहसीलदार, प्रांत घेतात हप्ते, जुमानतही नाही ; आमदारांचा आरोप

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ते खराब झालेत. राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणारे वाळूमाफिया तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलिसांना हप्ते देत असल्याचे सांगतात. दादागिरी करतात, कुणाला जुमानत नाहीत. माफियांवर कारवाई केली तर वरून फोन येतात, असा आरोप आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडल्यास आमदारांनी अधिकाऱ्यांना फोन करू नयेत, असा सल्ला दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या साेमवारी झालेल्या बैठकीत अवैध वाळूचा विषय चांगलाच तापला. या वेळी ग्रामविकाम मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. आमदार चिमणराव पाटील यांनी अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर आमदार एकनाथ खडसे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील या आमदारांनी वाळूमाफियांवर कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. किती वाळूमाफियांवर एमपीडीए, किती वाहनांवर कारवाई केली, ही विचारणा केली. तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेली वाहने परस्पर दंड न आकारता सोडून देण्यात येतात. अवैध वाळू उपसा होत असलेल्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली. तर विरोध केल्यामुळे वाळूमाफिया आमदारांच्या विरोधात जातील; मात्र या विरोधानंतर हप्ते वाढणार नाहीत, याचीही काळजी घ्या, असा प्रश्न आमदार किशोर पाटील यांनी उपस्थित केला.

सादरे प्रकरणाचा पुन्हा तपास करावा : चव्हाण वाळूमाफियांमुळे पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांना आत्महत्या करावी लागली. त्यांच्या पत्नीने चिठ्ठी लिहिलेली होती. त्यामध्ये वाळूमाफियांसह पाठीराख्यांची नावे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली.

कंत्राटदारावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनंेतर्गत भुसावळ तालुक्यातील एका रस्त्याच्या लोकार्पणासाठी गेलो तर रस्ताच दिसला नाही, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. या प्रकरणी शिवशक्ती कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...