आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने:तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंहांवरील खटले भाजपची सत्ता असलेल्या राज्यात वर्ग करण्याची मागणी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळेस गणेश मंडळांच्या सदस्यांवर व गणेश भक्तांवर लाठीमार करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांना निलंबित करण्यात यावे. त्याचप्रमाणे तेलंगणा येथील आमदार टी. राजा सिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी. त्यांच्याविरुद्धचे खटले महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात वर्ग करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती व हिंदूराष्ट्र सेनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली.

गोशामहल विधानसभा मतदार संघातील आमदार टी. राजा सिंह यांना 23 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. पी.डी. कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचा कट रचण्यात आला आहे. त्यांना मारण्याची धमकी दिली जात आहे. जीवे मारण्याच्या घोषणा देत आंदोलने केली जात आहेत. धमकी देणाऱ्यांना त्वरित अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी.

आमदार टी राजा सिंह यांना सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी.त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा राज्यात वर्ग करण्यात यावेत, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी केल्या. समाजसेवक आनंद मराठे आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले.

अंकिताच्या मोरकऱ्याला फाशी द्या

काही दिवसांपूर्वी दुमका येथे शाहरुख नावाच्या एका युवकाने बारावीत शिकणाऱ्या अंकीता या विद्यार्थिनीला पेट्रोल शिंपडून जीवंत जाळले. त्यात तिचा मृत्यू झाला. त्याला बंदीस्त केल्यानंतर पश्चाताप दूरच, तो मनमोकळेपणाने हसताना दिसला. हे अत्यंत निंदनिय आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. हे हत्या प्रकरण मारेकऱ्यापुरतेच मर्यादित न ठेवता अशा घटनांमागील मुख्य सूत्रधारांना शिक्षा झाली पाहिजेत, केंद्राने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...