आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसार भारती व दूरदर्शन महानिदेशालय यांच्यांतर्गत येणारे देशातील लघुशक्ती प्रक्षेपण केंद्रे बंद करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १४ केंद्रे जुलै महिन्यापासून बंद करण्यात आली आहेत. प्रक्षेपणाची अॅनालाॅग ही कालबाह्य झालेली प्रणाली व अनावश्यक खर्चावर नियंत्रण ही यामागील प्रमुख कारणे आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील दाेन तर सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील चार केंद्रांचा समावेश आहे.
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानात बदल हाेत आहेत. त्यामुळे जुने तंत्रज्ञान कालबाह्य ठरण्याने लघु शक्ती प्रक्षेपण केंद्रांची आवश्यकता भासत नाही. त्यांचे काम अगाेदरच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे फ्री टू एअर डिशद्वारे सुरू आहे. तरीही ही केंद्रे सुरू असल्याने त्याचे वीज बिल, देखभाल, मनुष्यबळाचे वेतन, इमारतींचे भाडे आदी सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचा खर्चाचा भुर्दंड शासनावर पडताे. ताे टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे.
संबंधित चॅनल फ्री-टू डिशवर आहेत सुरू
प्रसार भारतीतर्फे बंद करण्यात येत असलेले केंद्रांचे प्रक्षेपणाचे काम हे डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शासनाच्या ‘फ्री टू डिश’ याद्वारे सुरू आहे. शासनाच्या माेफत डिशवरून ९४ चॅनल हे विनामूल्य प्रक्षेपण हाेते. त्यासाठी केवळ सुरुवातीला एक डिश व सेट टाॅप बाॅक्स घ्यावा लागताे, नंतर महिन्याला कुठलेही शुल्क लागत नसल्याचे जळगाव दूरदर्शन उच्च शक्ती केंद्राचे सहायक अभियंता घुले यांनी सांगितले.
पाचव्या टप्प्यात ९९ केंद्रे बंद
तंत्रज्ञान अद्यायावत झाल्याने जुन्या अॅनालाॅग सिस्टिमद्वारे प्रक्षेपणातील दाेष असल्याने त्यांचा प्रेक्षक वर्गही झपाट्याने कमी हाेत असल्याचे केंद्राने २०१४ मध्ये याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या निर्दशनास आले हाेते. समितीच्या शिफारशीनुसारच टप्प्याटप्प्याने ही केंद्रे बंद करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ४ टप्पे झाले आहेत. आता पाचवा टप्पा सुरू आहे. यात देशातील ९९ तर पश्चिम विभागातील ३९ केंद्रांचा समावेश आहे. पश्चिम विभागात महाराष्ट्र, गाेवा, गुजरात, मप्र व छत्तीसगड या राज्यांचा समावेश आहे.
ही केंद्रे २३ जुलैपासून झाली बंद
पाचव्या टप्प्यात राज्यातील १४ केंद्रांचा समावेश आहे. त्यात बदलापूर, खाेपाेली, संगमनेर, शिर्डी, शहादा (चॅनल नं.१२) व शिरपूर (चॅनल नं. ७), खामगाव, चिखली, महाड व महालसे, माेरशी, तुमसर, उमरखेड (जि. नांदेड), पंढरपूर (जि. साेलापूर) या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवरील मनुष्यबळ नजीकच्या केंद्रावर वर्ग करण्यात आले आहे. या केंद्रातील यंत्रसामग्रीचे आयुष्य १० वर्षांचे होते, तर मशिनरीला २० वर्षे झालेली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.