आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान वाढले:ढगाळ वातावरणामुळे तापमान 35  अंशापुढे

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी ढगाळ वातावरणामुळे दुपारी उकाडा जाणवत होता. कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यामुळे थंडीची तीव्रता देखील कमी झालेली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमान ३३ अंशांवरून ३५ अंशांवर गेले आहे.

सोमवारी कमाल तापमान ३५.२ अंशांवर असताना किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर होते. तापमान वाढलेले असल्याने दिवसभरात वातावरणात उकाडा जाणवत होता. गेल्या आठवड्यात थंडीत वाढ झालेली होती. परंतु, या आठवड्यात पुन्हा तापमान वाढले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी ढगाळ वातावरण निवळून पुन्हा तापमानात घट होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...