आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या पंधरवड्यापासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढते आहे. त्यातच उत्तर भारत व दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम रेल्वेगाड्यांवर होताे आहे. उत्तर प्रदेश व दिल्लीकडून येणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावताना दिसत आहेत.
सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित दिसत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे अनेक एक्सप्रेस गाड्यांना सुरुवातीच्या स्थानकातूनच उशिराने सोडण्यात येत आहे. तसेच या धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या ह्या ताशी ४० ते ५० वेगाने धावत असल्याने या गाड्या नियमित वेळापत्रकापेक्षा चार ते पाच तास विलंबाने धावत आहेत. यात आग्रा केंट लोकमान्य टिळक सुपरफास्ट गाडी साडेपाच तास उशिराने धावली. तर ताप्तीगंगा एक्सप्रेस सहा तास, गोरखपूर लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस सहा तास, हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस तीन तास तसेच गोरखपूर-पुणे, बरेली लोकमान्य टिळक व कर्नाटक सुपरफास्ट ह्या गाड्या रविवारी अडीच तास उशिराने धावत होत्या. गेल्या काही दिवसांपासून थंडी व धुक्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसाेय झाली.
जानेवारी महिना थंडीचा आठवड्यात उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढू शकते. जानेवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येईल.
धुक्यात झाली वाढ वाढत्या थंडीसाेबतच जिल्ह्यात धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. या रविवारी धुक्यामुळे दृश्यमानता पहाटेच्या वेळी अवघ्या ७०० मीटरपर्यंत कमी झालेली हाेती. या आठवड्यात धुक्याचे प्रमाणही वाढू शकते.
दाट धुक्यामुळे दृश्यमानता अवघ्या ७०० मीटरवर, आठवड्यात धुके वाढू शकते जळगाव | नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे. रविवारी किमान तापमान ११ अंश तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीमध्ये काहीशी वाढ झालेली आहे. मंगळवारपर्यंत थंडी कायम राहणार असून, त्यानंतर वातावरण ढगाळ हाेऊन पुन्हा तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये किमान तापमानात माेठा चढ-उतार झाल्याने थंडीची तीव्रता जाणवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.