आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेची तीव्रता येत्या ८ जुनपासून कमीहोईल. उत्तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कसळणार असल्याने पुढीलआठवड्यात पारा चाळीशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जातआहे. साेमवारी जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढीलआठवड्यात राज्यात मान्सूनचेआगमनहोणार असून त्यापुर्वीच पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह उत्तरेत तीव्र झालेली उष्णतेची लाट पुढील दाेन दिवसांत कमीहोईल. जिल्ह्यात ४३ अंशावर गेलेले तापमान ४० अंशाखाली येणारआहे. ६ जून रोजी तापमान ४२.४ अंशावर तर वाऱ्याचा वेग ताशी २० किमी इतकाहोता. जिल्ह्यात ८ जूनपासून पुढीलआठ दिवस पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.