आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांना दिलासा:तापमानात बुधवारपासून घट; पूर्वमोसमीचे संकेत, पारा 42.2 अंशांवर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेची तीव्रता येत्या ८ जूनपासून कमी होईल. उत्तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळणार असल्याने पुढील आठवड्यात पारा चाळिशीच्या खाली उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनचे आगमन होणार असून त्यापूर्वीच पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह उत्तरेत तीव्र झालेली उष्णतेची लाट पुढील दोन दिवसांत कमी होईल. जिल्ह्यात ४३ अंशांवर गेलेले तापमान ४० अंशाखाली येणार आहे. ६ जून रोजी तापमान ४२.४ अंशांवर तर वाऱ्याचा वेग ताशी २० किमी होता. वाऱ्याचा वेग वावटळींमुळे वाढला होता. दुपारी १ वाजता तापमान ४१ अंशावर तर सूर्याच्या अतिनील किरणांचा इंडेक्स १३च्या सर्वाधिक उच्च पातळीवर होता. त्यामुळे झळा तीव्र जाणवल्या.

बातम्या आणखी आहेत...