आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्प‎:सरकारीकरणातून मंदिरे मुक्तीसाठी‎ तीव्र लढा देणार; परिषदेतून संकल्प‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारीकरण झालेली मंदिरे ‎सरकारीकरण मुक्त करून‎ भक्तांच्या नियंत्रणात यायला हवी.‎‘राम मंदिर तो झाँकी है, देशभर के‎ चार लाख मंदिर अभी बाकी है’‎ असे सांगत सरकारने नियंत्रणात ‎ ‎घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण‎ मुक्त करण्याचा संकल्प मंदिर‎ परिषद समारोपात करण्यात आला.‎ हिंदू जनजागृती समिती व‎ पद्मालय देवस्थानतर्फे दोन दिवसीय‎ मंदिर ध्यास परिषदेचे आयोजन‎ करण्यात आले होते.

मंदिर हे‎ शक्तिकेंद्र, भक्तिकेंद्र आणि‎ धर्मशिक्षण देणारे केंद्र असले‎ पाहिजे. मंदिरात भाविक‎ भक्तिभावाने दान देतात, त्यामुळे‎ मंदिरांतील निधी राजकीय‎ स्वार्थापोटी विकास कामांसाठी‎ वापरला जाऊ नये. मंदिरांचे‎ विश्वस्त, सदस्यांचे उत्तम संघटन‎ उभे राहिल्यास देशभरातील चार‎ लाख मंदिरे सरकारीकरण मुक्त‎ होतील असेही मान्यवरांनी आपल्या‎ मनोगतात सांगितले. हिंदू‎ जनजागृती समितीचे कोणतेही‎ मंदिर नाही.

मात्र, प्रत्येक मंदिर हे‎ हिंदू जनजागृती समितीसाठी धर्माचे‎ केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण‎ झालेले प्रत्येक मंदिर‎ सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी‎ लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदू‎ जनजागृती समिती’चे महाराष्ट्र‎ आणि छत्तीसगड राज्य संघटक‎ सुनील घनवट यांनी केली.‎ राजकीय, न्यायव्यवस्था क्षेत्रांतील‎ काही व्यक्ती मोठेपणासाठी‎ विश्वस्त मंडळात येण्यासाठी‎ प्रयत्नशील आहेत. मंदिरे ही‎ व्यक्तिगत लाभासाठी नाहीत. जेव्हा‎ मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे‎ जाईल, तेव्हा मंदिरांचा विकास‎ निश्चित होईल, असे आचार्य‎ सुधीरदास महाराज यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...