आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरावस्था:धानोऱ्यात दहा लाखांचे वॉटर कुलर तहानले; दीड वर्षापासून 2 कुलर बंद

धानोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दोन ठिकाणी लावलेले वॉटर कुलर सुरु न झाल्याने ग्रामस्थांना सुविधा मिळत नाही. या यंत्रणेच्या उभारणीवर सुमारे १० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. याठिकाणी ठेवलेले पाण्याचे जारही गायब झाले असून, ग्रामपंचायतीने वॉटर कुलरच्या जागी कचराकुंड्या आणून ठेवल्या आहेत.

सप्टेंबर २०२० मध्ये ग्रामपंचायत प्रशासक जितेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीला लागून एक, तसेच दलित वस्तीत एक असे दोन वॉटर कुलर बसवले आहेत. दोन्ही ठिकाणी १५ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव जि.प. यांत्रिकी विभागाच्या अभियंत्यांनी तपासणी करुन अहवाल दिला होता. दोन्ही वॉटर कुलरमधून शुद्ध व थंड पाण्याची तपासणी केली होती. परंतु त्यानंतर काही दिवसातच दोन्ही वॉटर कुलर कुलूपबंद झाले. सध्या ग्रामपंचायतीलगत असलेल्या वॉटर कुलरमध्ये चक्क कचराकुंड्या ठेवल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी चुप्पी साधली आहे. दोन्ही वॉटर कुलर धुळखात पडलेले असल्याने, ग्रामस्थांना उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे अशी मागणी अपेक्षा आहे. याबाबत ज्ञानेश्वर सोनवणे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. ग्रामस्थांच्या उपयोगी असलेले वॉटर कुलरच तहानलेले आहे.ग्रामस्थांना पाणी न मिळाल्यास दहा लाख रुपये पाण्यात जातील, असे योगेश्वरी सोनवणे यांनी सांगितले.

त्यानंतर काही दिवसातच दोन्ही वॉटर कुलर कुलूपबंद झाले. सध्या ग्रामपंचायतीलगत असलेल्या वॉटर कुलरमध्ये चक्क कचराकुंड्या ठेवल्या आहेत. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी चुप्पी साधली आहे. दोन्ही वॉटर कुलर धुळखात पडलेले असल्याने, ग्रामस्थांना उन्हाळ्यात थंड पाणी मिळावे अशी मागणी अपेक्षा आहे. याबाबत ज्ञानेश्वर सोनवणे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारणा केली. परंतु त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. ग्रामस्थांच्या उपयोगी असलेले वॉटर कुलरच तहानलेले आहे.ग्रामस्थांना पाणी न मिळाल्यास दहा लाख रुपये पाण्यात जातील, असे योगेश्वरी सोनवणे यांनी सांगितले.

अडचणी सोडवून वॉटर कुलर तातडीने सुरू करणार

तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरच ग्रामस्थांसाठी वॉटर कुलर सुरु होईल. यासंदर्भात पाठपुरावा करून समस्या सोडवू. विकास इंधे, ग्रामविकास अधिकारी, धानोरा ता.चोपडा

बातम्या आणखी आहेत...