आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:तेरापंथ सभेतर्फे राखी बनवा स्पर्धा

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन श्वेतांबर तेरापंथ सभा अंतर्गत ज्ञानशाळेत रविवारी राखी बनवा स्पर्धा घेण्यात आली. त्यात ३५ मुलांनी सहभाग घेऊन आकर्षक राख्या बनवल्या. ज्ञानशाळेचे महाराष्ट्र संयाेजक राजकुमार सेठिया, सभा अध्यक्ष जितेंद्र चाेरडिया, सचिव नीरज समदडिया, ज्ञानशाळा संयाेजक नाेरतमल चाेरडिया, संगीता श्रीश्रीमाळ उपस्थित हाेते. दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

लहान गटात प्रथम अरिहंत सेठिया, द्वितीय निधी सेठिया, तृतीय अर्हम सांखला विजयी झाले. तीर्थ बैद व उन्नती कुचेरिया यांना उतेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. माेठ्या गटात प्रथम जनक छाजेड, द्वितीय आयुष गेलडा, तृतीय पूर्वी पिंचा हे विजयी झाले. तर सुहानी छाजेड व माही चाेरडिया यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावले.

बातम्या आणखी आहेत...