आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिरसोलीतील 'त्या' महिलेचा गळफासाने मृत्यू; व्हिसेरा ठेवला प्रिझर्व्ह, पतीला चौकशी करून सोडले

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरसोली येथील राजपाल नगरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह सोमवारी पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास किचनमध्ये आढळून आला. त्या महिलेच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. तिच्या पतीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, गळफासाने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर पतीला सोडून देण्यात आले.

अशी घडली घटना

नबाबाई भाऊलाल भिल, (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. भाऊलाल पांडुरंग भिल यांना पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास पत्नी नबाबाई ह्या किचनमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी शेजारील महिला मंगलीबाई ठाकरे यांना पत्नी घरात मृतावस्थेत असल्याचे सांगितले. ठाकरे यांनी शिरसोलीचे पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांना पहाटे 3.14 वाजता घटनेची माहिती दिली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवले.

सकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतीलाल पवार, जितेंद्र राठोड, शुध्दोधन ढवळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी गेले. मृत महिलेच्या अंगावर जखमा नव्हत्या मात्र, मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. नबाबाई यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी पती भाऊलाल भिल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

साडीने घेतला गळफास

पोलिसांनी भाऊलाल यांची कसून चौकशी केली. पहाटे किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. घाबरुन गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर साडीचे तुकडे करुन कॉटच्या ड्रॉव्हरमध्ये टाकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नबाबाई यांच्याचे शवविच्छेदन करण्यात आले. गळफासामुळे नबाबाई यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला सोडून दिले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहा मुलींसह मुलगा पोरका

नबाबाई या जैन व्हॅली येथे काम करीत होत्या. भाऊलाल भिल हे ट्रॅक्टरचालक आहेत. राजपाल नगरातील विरळ वस्तीत त्यांनी सुखवस्तू घर बांधलेले आहेत. त्यांना संदिप (13),संगिता (10),लक्ष्मी (9),कविता (7),शितल (5),सविता (4) व सरला (3) अशा सहा मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सर्व पोरके झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...