आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेमिची येतो पावसाळा, दैना झाली पळापळा’असं म्हणण्याची वेळ यंदाही जळगावकरांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्याच पावसाने यंदाही त्याची चांगलीच प्रचिती जळगावकरांना दिली आहे.वर्षांनुवर्षे शहरातील ज्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आले आहे तिथे ते साचू नये म्हणून महापालिका काहीही करायला तयार नाही. या साठणाऱ्या पाण्यामुळे पावसानंतर जळगावातील वाहनचालकांचे, त्या भागात राहाणाऱ्या नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे होणारे हाल महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तर दिसत नाहीतच; पण प्रशासनालाही त्याबाबत दृष्टिदोष निर्माण झाला आहे की काय, असा प्रश्न पडतो.
नागरिकांना या पाण्यातून वाहने नेतांना जणू ‘वॉटर स्पोर्ट’चा आनंद मिळत असावा, असा महापालिकेचा समज झालेला असावा, अशी स्थिती आहे. त्यामुळे पावसाळा पूर्व कामात यंदाही या ठरलेल्या जागांच्या बाबतीत चर्चाही करण्यात आली नाही. रस्त्यांवर भर टाकताना बाजूचा रस्ता खाली आणि नवा रस्ता वर जातो, मोठी गटार तिला मिळणाऱ्या लहान गटारींपेक्षा उंचावर असते, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला व्यवस्थाच नसते अशी कारणे हे पाण्याचे तळे साचायला कारणीभूत आहेत.
रथ चौक परिसर : शहरातील रथ चौकचा परिसर खुप वर्दळीचा आहे. या भागातही गेल्या अनेक वर्षांपासून गटारी तुंबल्याने पावसाच्या पाण्याचे तळे साचले. खोलगट भाग असल्याने पाण्याचा निचरा होताना अडचणी येतात. यंदाही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. जुने बसस्थानकच्या पाठीमागील भागातही अशीच समस्या आहे. चित्राचौकडे जाणाऱ्या रस्त्यावरही दोन ठिकाणी पावसाचे पाणी साचते.
जिल्हा परिषद चौक
जिल्हा परिषद चौकात शिवाजीनगर उड्डाणपुलाची उभारणी झाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरी रस्ता नाही. रेल्वे स्टेशन रस्त्यापासून झेडपीकडे जाणाऱ्या रस्त्याचे स्क्रॅपिंग केले आहे; परंतु एक रस्ता खाली व गटार उंचावर असल्याने पावसाचे पाणी साचते. मात्र, असे असले तरी उड्डाणपुलाच्या मक्तेदाराच्या प्रतिनिधींनी पाणी साचणार नाही, असा दावा केला आहे.
कोर्ट चौकासमोर : जिल्हा न्यायालय अर्थात कोर्ट चौक हे शहराच्या मध्यवर्ती भागातील ठिकाण. गणेश कॉलनी रस्त्यावर दुभाजक उभारल्यानंतर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. न्यायालयाच्या संरक्षण भिंतीला लागून मोठी गटार आहे; परंतु समाेरच्या बाजूने अर्थात जे.टी. चेंबरकडे गटार नसल्याने पाणी रस्त्यावर साचते.
जिल्हा क्रीडा संकुल
शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा मार्ग असलेल्या बसस्थानक ते कोर्ट चौकादरम्यान जिल्हा क्रीडा संकुलासमोर रस्त्याची उंची वाढत असली तरी पाणी साचण्याची समस्या सुटलेली नाही. संकुलातील दुकानदारांनी गटारी बंदिस्त केल्या आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलासह लांब अंतरावरून वाहत येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो त्यामुळे पाणी साचत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.