आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:बकाले प्रकरण; अशोक महाजनांच्या अटकपूर्ववर युक्तिवाद झाला पूर्ण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पाेलिस निरीक्षक बकाले प्रकरणाची आॅडिआे क्लिप व्हायरल करणाऱ्या एएसआय अशाेक महाजन यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीत दाेन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. बुधवारी निकाल देण्यात येणार आहे.

दाेन महिन्यांपूर्वी एलसीबीचे तत्कालीन पीआय किरणकुमार बकाले यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याची आॅडिआे क्लिप व्हायरल करणाऱ्या एएसआय अशाेक महाजन यांना या गुन्ह्यात सुरुवातीला साक्षीदार व नंतर आराेपी करण्यात आले आहे. बकालेचा अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतर महाजन यांनीही अटकपूर्वसाठी अर्ज केला. दिवाळीपूर्वी न्यायाधीश एस. एन. माने यांच्या काेर्टात सुनावणी सुरू झाली हाेती. मंगळवारी पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...