आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठामंत्री पाटील:केळी महामंडळ आता आले स्थापनेच्या अंतिम टप्प्यात ; केळी प्रक्रियेचे धोरण तयार करणार

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळी महामंडळ स्थापनेच्या अंतिम टप्प्यावर आहे. हे महामंडळ स्थापन झाल्यानंतर केळीवर प्रक्रिया करण्यासाठी शासन धोरण तयार करत आहे. शिवाय अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहारात केळीचा समावेश करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. हा निर्णय झाल्यास वर्षात १ लाख २० हजार टन केळी अंगणवाडीसाठी लागतील. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

अजिंठा विश्रामगृहात शुक्रवारी कालवा सल्लागार समिती व कृषी विभागाच्या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पीक विम्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, चुकीच्या कागदपत्रांमुळे बँकांनी त्यांची हेळसांड केली, अशा बँकांना बोलवून शेतकऱ्यांचे पैसे दहा दिवसांच्या आत देण्याच्या सूचना दिल्या. नाही तर १२ टक्के व्याजासह पैसे देण्याचा शासन निर्णय आहे. बँकांनी तसे कबूल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...