आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी घटणार:ढगाळ वातावरणाने हाेईल डिसेंबरची सुरुवात, तापमान वाढून थंडी घटणार

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेरड्या हवामानात सध्या १० अंश सेल्सिअसखाली गेलेला तापमानाचा पारा येत्या आठवड्यात वाढून पुुन्हा १५ अंश सेल्सिअसपुढे जाणार आहे. डिसेंबर महिन्याची सुरुवातच ढगाळ वातावरणाने हाेणार असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता घटेल. त्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते. ३० नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्यात वातावरण बहुतांशपणे ढगाळ असेल.

गुरुवारी किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर हाेते. ते पुढील आठवड्यात वाढून १५ अंश सेल्सिअसपुढे जाणार आहे. १८ नाेव्हेंबरपासून राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. राज्यात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले आहे. जळगाव जिल्ह्यात सलग ८ दिवस तापमान १० अंशांखाली हाेते.

उत्तरेतील वाऱ्यांचा प्रभाव
उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक आहे. बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून वाहणारे गार वारे सर्वात आधी उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करतात. त्यामुळे राज्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र अधिक गारठला आहे. ढगाळ वातावरणामुळे या वाऱ्याची तीव्रताही कमी हाेईल. त्यामुळे पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढ हाेऊ शकते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...