आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न:जळगाव जिल्ह्यात मध्यरात्री रंगला थरार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातल्या वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. जुबेर इकबाल तडवी (वय 22) असे त्याचे नाव असून, त्याची रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार म्हणून नोंद आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (11 जून) मध्यरात्रीच्या वेळी चोरट्याने वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र गाठली. त्याने बॅंकेचा मुख्य दरवाजा तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्लॅन फसल्याने तो घटना स्थळावरून निघून गेला. या प्रकरणी पाचोरा पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातील संशयित हा जुबरे असल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोपी जुबेर इकबाल तडवी
आरोपी जुबेर इकबाल तडवी

गुन्ह्याची दिली कबुली

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, उपनिरीक्षक अमोल देवढे, लक्ष्मण पाटील, किशाेर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील यांच्या पथकाने जुबेर याला कासलीच्या आठवडे बाजारातून ताब्यात घेतले. खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, त्याने यापूर्वी देखील जामनेर शहरात अशाच प्रकारे बँक फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील तपासासाठी त्याला पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...