आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा लाखांच्या कामांना थेट मंजुरी देण्याचे अधिकार:शहर अभियंता आता मंजूर करेल १० लाखांची कामे

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाकडून दीड महिन्यांपूर्वीच नियुक्ती झालेले शहर अभियंता एम.जी. गिरगावकर यांच्या अधिकारात वाढ करण्यात येणार आहे. शहर अभियंत्यांना दहा लाखांच्या कामांना थेट मंजुरी देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येणार आहेत. यामुळे नगरसेवकांनी सुचवलेली किरकाेळ कामे मार्गी लावणे हा यामागील प्रयत्न आहे.
मनपाची निवडणूक पुढच्या वर्षी आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांकडे कामांसाठी दबाव वाढवणे सुरू केले आहे. घराच्या परिसरातील लहान गटारी, ढापे आदी किरकाेळ स्वरूपातील कामे मार्गी लावण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय साेपस्कार पार पाडावे लागत आहे. परिणामी वेळही खर्च हाेताे आहे. नागरिकांचा राेष वाढत असल्याने किमान १० लाखांपर्यंतची कामे मंजूर करून सुरू करण्यासाठी थेट शहर अभियंत्यांना अधिकार देण्याचा विचार केला जाताे आहे.
सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न
आतापर्यंत महापालिकेचे अधिकारी शहर अभियंता पदाची प्रभारी जबाबदारी सांभाळत हाेते; परंतु विद्यमान शहर अभियंता गिरगावकर सनदी अधिकारी असल्याने त्यांच्या माध्यमातू कामांना गती देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे

बातम्या आणखी आहेत...