आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या हिवाळ्यातील उच्चांकी:थंडी पुन्हा गायब; किमान तापमान 21.9 अंशांवर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडी वाढल्याने शनिवारी अवघे ८.५ अंश सेल्सिअसचा निच्चांक गाठलेले किमान तापमान साेमवारी २१.९ अंश सेल्सिअसवर पाेहाेचले. यंदाच्या हिवाळ्यातील ते उच्चांकी आहे. दाेनच दिवसांत किमान तापमानात १३.४ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने जिल्ह्यात थंडीचा प्रभाव पूर्णपणे घटला आहे. ढगाळ वातावरणामुळे ही स्थिती ओढवली आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील. डिसेंबर महिन्यात किमान तापमानात माेठ्या प्रमाणात चढ-उतार हाेत आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमान १८ अंशावरून ११ अंशावर आणि तेथून १० डिसेंबरला ८.५ अंशावर गेले हाेते. साेमवारी थेट २१.९ अंश तापमान नाेंदवले गेले. तापमानातील चढ-उतारामुळे थंडीही कमी-अधिक हाेत आहे. गेल्या दाेनच दिवसांत थंडीतील हा चढ-उतार आराेग्यावर परिणाम करणारा ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...