आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने गायब झालेली थंडी गुरुवारनंतर परतणार, ‘वीकेंड’ला तुरळक पाऊस

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात थंडी गायब झाली आहे. साेमवारी किमान तापमान १९.८ अंशांच्या उच्चांकावर गेल्याने वातावरणात उकाडा वाढला. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी गुरुवार आणि शुक्रवारी परत येऊ शकते. त्यानंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ढगाळ वातावरणामुळे उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. वातावरण ढगाळ असल्याने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे. जळगावात आठ दिवसांत तब्बल १० अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढले आहे. त्यामुळे थंडी गायब हाेऊन वातावरणात उकाडा जाणवताे आहे. रात्रीच्या वेळी किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअस या यंदाच्या हिवाळ्यातील उच्चांकावर पाेहाेचले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी शनिवारनंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान, या कालावधीत जर पाऊस झाला तर रब्बी हंगामातील पिकांसह कापूस, तूर, सूर्यफुलाचे नुकसान हाेण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पेरू, लिंबू, बाेरं, आंब्याच्या बागांनाही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...