आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगाळ वातावरण:थंडी  आजपासून पुन्हा परतणार, दाेन  आठवडे कडाक्याचे संकेत

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यापासून २१ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर असलेले किमान तापमानात शनिवारी किंचित घट हाेऊन पारा १९.३ अंशांवर आला. काही अंशी ढगाळ वातावरण निवळल्याने तापमानात घसरण हाेऊन थंडी वाढते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारपासून तापमान कमी हाेऊन थंडी परत येईल. पुढील दाेन आठवड्यात थंडीचा कडाका वाढू शकताे.

गेल्या आठवड्यात प्रथमच जिल्ह्यात किमान तापमान २१.९ अंशाच्या उच्चांकावर गेले हाेते. दिवसा ३३ अंशांपर्यंत हा उच्चांक हाेता. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढलेला हाेता. जिल्ह्यात ११ ते १६ डिसेंबरपर्यंत ही स्थिती कायम हाेती. आता ढगाळ वातावरण निवळले आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल हाेत आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळू शकते. असे झाल्यास किमान तापमानात चार ते पाच अंशांनी घट हाेऊन पारा १४ ते १५ अंशांपर्यंत खाली येईल. परिणामी थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे. शनिवारी किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअवर हाेते. कमाल तापमान उच्चांकी पातळीवर म्हणजे डिसेंबर महिन्यातील सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने अधिक हाेते. त्यामुळे दिवसा देखील उकाडा जाणवत हाेता.

उत्तरेकडील वाऱ्याचा जाेर वाढल्याने चिंता कायम
ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग कमी असल्याने उत्तरेतील थंड वाऱ्याचा जाेर आेसरला हाेता. त्यामुळे जिल्ह्यात थंडी कमी झाल्याचे जाणवत हाेते. आता आकाश निरभ्र झाले असून वाऱ्याचा वेग वाढून दिशाही बदलते आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा उत्तरेतील थंड वाऱ्याचा जाेर वाढू शकताे. या महिन्याअखेरपर्यंत थंडीत वाढ हाेईल. जानेवारीत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...